सखी एक थांबा केंद्र: महिलांसाठी मदतीचा हात
‘सखी एक थांबा केंद्र’ (Sakhi One Stop Centre) ही महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकारने २०१५ पासून सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि पीडित महिलांना मदत व संरक्षण देण्यासाठी ही केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये महिलांसाठी दहा दिवसांपर्यंत तात्पुरता निवारा, कायदेविषयक मदत, वैद्यकीय मदत, पोलिस मदत, समुपदेशन, आपत्कालीन मदत अशा सर्व सेवा मोफत आणि एका छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. हिंसाचारग्रस्त महिलांसाठी येथे सुरक्षित निवासाची सोय आहे. तज्ज्ञ वकिलांकडून कायदेशीर सल्ला आणि मदत मिळते, तसेच वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचारांसाठी सुविधा पुरवली जाते. मानसिक आणि भावनिक आधारासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध असून, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांद्वारे महिलांना भविष्यासाठी सक्षम बनवले जाते.
‘सखी एक थांबा केंद्र’ हे कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, लैंगिक छळ, ॲसिड हल्ला, बाल अत्याचार, बालविवाह, अनैतिक मानवी वाहतूक, आणि अपहरण अशा घटनांमध्ये पीडित महिलांना मदत करते. जर तुम्हाला किंवा कोणत्याही महिलेला अशा मदतीची गरज असेल, तर त्वरित आपल्या जिल्ह्यातील ‘सखी एक थांबा केंद्रा’शी संपर्क साधा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि त्याचा लाभ आपण आवश्य घ्यावा.
सखी एक थांबा केंद्राबद्दल आणि तिथे मिळणाऱ्या सेवा – सुविधांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!
#SakhiOneStopCentre #महिला_सुरक्षा #ViolenceNoMore