“सुखी संसारातले हिंसेचे विषारी तण”
“घरगुती लैंगिक अत्याचार सहन करणे हे स्त्रीचं कर्तव्यच आहे! “, अशी सामान्यपणे समाजामध्ये धारणा असते. या व्हिडियो मध्ये हि धारणा कशी चुकीची आहे हे दोन मैत्रिणीच्या गोष्टीतून स्पष्ट केले आहे. अशा धारणांचे मूळ कारण, त्याचे परिणाम व अशा धारणेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग दाखवला आहे. हि गोष्ट एका ग्रामीण स्त्रीची आहे जी वैवाहिक अत्याचार सहन करत असते. तिची मैत्रीण “शेतातील तण” या उदाहरणातून तिला वास्तवाचा बोध घडवून देते. ती तण आणि अत्याचार यातील प्रतीकात्मक साम्य प्रभावीपणे दाखवून देते. संवादातून महिलांच्या दुःखाला आणि त्यांच्या अंतर्गत संघर्षाला नवी दिशा दिली आहे. हि गोष्ट स्त्रीच्या आत्मसाक्षात्काराचा आणि सशक्तीकरणाचा प्रवास दाखवते. सामाजिक शांततेसाठी वैवाहिक आदर आणि समानतेचा महत्त्वपूर्ण संदेश यात दिला आहे. “सखी” वन स्टॉप सेंटरसारख्या सहाय्यक संस्थांची उपयुक्तता देखील यात नमूद केली आहे. हा व्हिडियो सामाजिक जागृतीसाठी निर्माण केला असून शेवटी “तण काढल्यावरच सुखाचं पीक फुलतं” हा आशादायी संदेश या व्हिडियोच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.